satara 
सातारा

आईला पाहताच जुवेरिया बिलगली! मुंबई दलातील हवालदार महिलेची पाच महिन्यांनी कुटुंबाशी भेट

अनिल घाडगे

शिरवडे (सातारा) : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या मुळच्या शिरवडे स्टेशन येथील महिला पोलिस हवालदाराची तिच्या मुलीशी तब्बल पाच महिन्यांनी भेट झाली. कोरोना महामारीमुळे तिच्या आईला सुटी नव्हती अन्‌ गावाकडे येण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची ताटातूट झाली होती. मिनाज असिफ खान-संदे असे महिला हवालदाराचे नाव आहे. पाच महिन्यांनी मुलीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
 
नडशी येथील शब्बीर संदे यांची कन्या मिनाज या मुंबई पोलिस दलात खेळाडू कोट्यातून भरती झाल्या आहेत. रोजच्या संपर्कामुळे त्या स्वत:ची काळजी घेत आहेत. चिमुकली मुलगी, वयस्कर आई-वडील, भाऊ यांना गावकडे ठेवून मिनाज या सेवा करत आहे. माटुंगा येथे त्या ड्युटीस आहेत. तेथे त्यांच्या बहुतांश सर्वच सहकाऱ्यांना कोरोनाने गाठले. तरीही न डगमगता त्या सेवा करत होत्या. तब्बल पाच महिन्यांनी त्यांना सुटी मिळाली. दोनदिवसांपूर्वी त्या सुटीनंतर मिनाज या पाच वर्षांच्या जुवेरियाला भेटल्या. आई व मुलगी दोघीही गहिवरल्या, तर मिनाज यांच्या आई, वडिलांना हुंदका आवरला नाही. सुटीनंतर पुन्हा त्याच उमेदीने त्या पुन्हा सेवेत हजर होण्यासाठी तत्पर आहेत. 

मिनाजचे वडील शब्बीर संदे म्हणाले, कोरोना महामारीत पोलिस दलात सेवा देणाऱ्या मिनाजचे कौतुक आहे. तिने अजून प्रगती करून गावाचे, तालुक्‍याचे, जिल्ह्याचे नाव गाजवावे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT