सातारा

मांजामध्ये अडकलेल्या घारीला तब्बल सहा दिवसांनी जीवदान

गिरीश चव्हाण

सातारा : पोवई नाका परिसरातील एसटी कॉलनीत असणाऱ्या निलगिरीच्या झाडावर सहा दिवस मांजात अडकलेल्या घारीची सुटका शुक्रवारी प्राणीमित्र, नागरिक आणि सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली. 

पोवई नाका परिसरातून पारंगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटी कॉलनी असून, याठिकाणी निलगिरीची झाडे आहेत. या झाडांच्या शेंड्यात असणाऱ्या मांजाच्या गुंत्यात गेल्या सहा ते सात दिवस एक घार अडकली होती. झाडावर घार अडकल्याची माहिती शुक्रवारी काही नागरिकांनी प्राणीमित्र तसेच सातारा पालिकेस दिली. यानुसार प्राणीमित्र त्याठिकाणी आले. त्यांनी पाहणी केली. मात्र, झाड उंच असल्याने घारीपर्यंत पोचणे त्यांना शक्‍य झाले नाही. यानंतर काही जणांनी यासाठी पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांना मोबाईल करत मदत मागितली. 

यानुसार शेंडे यांनी तत्परता दाखवत विद्युत देखभालीच्या कामासाठी वापरण्यात येणारी क्रेन व कर्मचारी त्याठिकाणी पाठवून दिले. क्रेनमधून दोन जणांनी घारीजवळ पोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. यानंतर क्रेन व कळकाच्या साह्याने बनविलेल्या आकड्याच्या साह्याने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नाने मांजात अडकलेल्या घारीला खाली काढण्यात आले. यानंतर प्राथमिक उपचार करून तिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT