सातारा

Video पाहा : भाजप हटाव, देश बचाव; काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घाेषणांनी कराड दणाणले

हेमंत पवार

कराड : पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅंग्रेसच्या वतीने कराड येथे आंदाेलन करण्यात आले. 

कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज (शुक्रवार) शेतकरी विरोधी कायद्याविरोधात आणि पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने गॅस पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे, शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द झाले पाहिजेत यासह अन्य मागण्या केल्या. कराड बंदचे आवाहनही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आले.

माेदी सरकारने मला जबरदस्ती निवृत्त केले; IPS अधिका-याचा फाेटाे व्हायरल

भाजप हटाव, देश बचाव : कॉंग्रेसचा नारा

कृषी कायदे रद्द करावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान ३०० शेतकरी हुतात्मा झाले तरीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीने सामान्यांचे कबंरडे मोडले आहे. त्यामुळे ही दरवाढ रद्द करुन कृषी कायदा विधेयक मागे घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज येथे दिला.

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे व पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काॅंग्रेसने येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले.

पक्ष मजूबत करा; राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांकडून सदस्यांची कानउघडणी

यावेळी मलकापुरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मजहर कागदी, कॉंग्रेसचे कऱ्हाड शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, युवा नेते राहुल चव्हाण, पैलवान नानासाहेब पाटील, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र नांगरे-पाटील, विजय मुठेकर आदि उपस्थित होते. यावेळी भाजप हटाव-देश बचाव, इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे व कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या.

सरपंच जावयासाठी धावले माजी मंत्री सासरे!; ताेडलेला वीजपुरवठा तत्काळ जोडला गेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT