सातारा

राष्ट्रवादीच्या नेत्याने ग्रामीण भागातील शाळांना दिले थर्मामीटर

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या ग्रामीण भागातील शाळांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या वतीने इन्फ्रारेड थर्मामीटरचे, तर सर्वसामान्य जनतेसाठी औषधी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांची गैरसोय टाळण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरचे तसेच सामान्य रुग्णांना लाभ व्हावा, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्‍यक औषधी साहित्य देण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

कोरेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात तेजस शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. यावेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, डॉ. योगेश टिकोळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, डॉ. गणेश होळ उपस्थित होते. 

तेजस शिंदे म्हणाले, ""कोरोना काळात आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग केले. त्याची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अंमलबजावणी झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या घटली. ग्रामीण रुग्णालयासह सातारा व खटाव तालुक्‍यांमध्ये उपाययोजनेसाठी आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित केली. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे.'' सभापती जगदाळे, डॉ. होळ यांची भाषणे झाली. 

शरद पवारांसोबत रहा तुमचे प्रश्न सुटतील; रामराजेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

प्रतीक्षा संपली! सरपंच निवडीसाठी विशेष सभा बाेलविण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT