सातारा

संस्कृती आणि विचार अखेरपर्यंत जिवंत ठेवणार; रामराजेंचा भाजपला टाेला

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याची एक संस्कृती आणि विचार आहे, तो अखेरपर्यंत जिवंत ठेवणार असून दुसरा विचार येथे येऊ देणार नाही, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्यापूर्वी आलेले दीपक पवार काही काळातच निघून गेल्याने त्याचीच चर्चा रंगली होती.
 
मेढा येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, सुनील माने, एस. एस. पार्टे, सभापती जयश्री गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, एकनाथ ओंबळे, यशवंत घाटगे, धनश्री महाडिक, रोहिणी निंबाळकर उपस्थित होते. सदाशिव सपकाळ, एस. एस. पार्टे आदींची भाषणे झाली. सुरेश पार्टे यांनी सूत्रसंचालन केले.
 
दरम्यान, मेळाव्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार आले. त्यांनी व्यासपीठावर सभापती जयश्री गिरींना पाहिले. त्यानंतर ते आमदार शशिकांत शिंदेंशी बोलून निघून गेले. बापू आले आणि का गेले, याची चर्चा रंगली. अखेर शशिकांत शिंदेंनी भाषणात दीपकबापू नाराज झालेत. त्यांची नाराजी दूर करू, योग्य वेळी पक्ष त्यांचा सन्मान करेल, असे स्पष्टीकरण दिले.


विधानसभेच्यावेळी माझ्या विरोधात घरोघरी जावून भाजपचा प्रचार करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्टेजवर कशासाठी? त्यामुळेच मी निघून गेलो. शरद पवारांचे विचार मानणारा मी असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचेच काम करणार आहे. 
- दीपक पवार, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT