satyajitsinh patankar system
सातारा

जीव गेल्यास गप्प बसणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार तालुक्‍याला चार व्हेंटिलेटर आणि दहा ऑक्‍सिजन मशिन तालुक्‍याला मिळणार असल्याचेही श्री. पाटणकर यांनी सांगितले.

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील कोरोना रुग्णांसाठी 50 बेड पाटण कोरोना केअर सेंटरला (corona care center) देण्याची घोषणा केली होती. अद्याप त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापुढे प्रशासकीय यंत्रणा किंवा अपुऱ्या सुविधांमुळे कोणाचा बळी गेला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर (satyajitsinh patankar) यांनी पत्रकार परिषदेत दिला. (ncp-leader-satyajitsinh patankar warns satara district administration marathi news)

श्री. पाटणकर म्हणाले, ""पाटण तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची पहिली लाट परतवून लावणारा पाटण तालुका दुसऱ्या लाटेत बेजार झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या उपचार सुविधा अशी स्थिती आहे. तालुक्‍यातील कोविड सेंटरसाठी वाढीव बेड व इतर आवश्‍यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते; परंतु अद्यापही त्या मिळालेल्या नाहीत. पाटण तालुक्‍यातील रुग्णांना उपचारासाठी कऱ्हाड, साताऱ्याला जावे लागत आहे; परंतु तिथेही या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत.

त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या आम्ही वैयक्तिक खर्चातून व संस्थांच्या मदतीने पाटण सेंटरला ऑक्‍सिजन बेड उपलब्ध केले. अतिरिक्त सुविधांचा प्रशासनाने तत्काळ व तितक्‍याच गांभीर्याने विचार करावा. त्यासाठी वाटेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत.''

माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार तालुक्‍याला चार व्हेंटिलेटर आणि दहा ऑक्‍सिजन मशिन तालुक्‍याला मिळणार असल्याचेही श्री. पाटणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT