एसटीचा संप; प्रवाशांची गैरसोय व खोळंबा sakal
सातारा

सातारा : एसटीचा संप; प्रवाशांची गैरसोय व खोळंबा

खाजगी वाहनांची लूट जिल्हा रायगड

अमित गवळे

पाली : महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एैन दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल झालेले दिसले. अशावेळी प्रवाश्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे अनेक खाजगी वाहतूक दारांनी अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट केली.

रविवारी (ता.7) व सोमवारी (ता.8) मुंबई गोवा महामार्गावर तसेच इतर मार्गांवरील बस थांबे व नाक्यांवर वाहनांची वाट बघत प्रवासी तासनतास उभे होते. वृद्ध व महिलांचे खुप हाल झाले. प्रवाश्यांना अधिकचे पैसे देऊन खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. पाली ते खोपोली फाटा या 30 किमी अंतरासाठी खाजगी वाहने 80 ते 100 रुपये घेत होते. तर खोपोली फाटा ते लोणावळा या अवघ्या 8 ते 9 किमी अंतरासाठी खाजगी वाहने तब्बल 80 रुपये घेत होते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी तर भरमसाठ पैसे आकारले जात होते.

लता माळी या महिलेने सांगितले की गावी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर एसटी ची वाट पाहत उभे होतो. मात्र 3 तास थांबून एकही एसटी आली नाही. त्यामुळे अधिकचे पैसे देऊन खाजगी वाहनाने गावी पोहोचलो. पैसे तर गेलेच पण गैरसोय देखील झाली. गावागावात जाण्यासाठी अनेकांना मिनीडोअरचा आधार मिळाला. तर लांबच्या पल्ल्यासाठी खाजगी वाहने उपयोगी आली. या सर्व गाड्या प्रवाश्यांनी अगदी खचाखच भरुन जात होत्या. परिणामी खाजगी वाहतूकदारांचा धंदा तेजित होता. त्यांना जणू काही दिवाळीचा बोनस मिळाला. जिल्ह्यातील लांब पल्याच्या काही एसटी गाड्या सुरू होत्या. मात्र त्याही इच्छित स्थळी गेल्यानंतर तिथून पुढे जात नव्हत्या. जवळच्या थांब्यावरील प्रवाशांना देखील घेत नव्हत्या. त्यामुळे या प्रवाशांचे देखील प्रचंड हाल झाले.

बस स्थानकांवर गर्दी

ज्यांना या संपाबद्दल माहित नव्हते ते प्रवासी बस स्थानकात आले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु गाड्याच नाही हे समजल्यावर त्यांनी तेथून परतीचा मार्ग पकडला. जो तो मिळेल त्या वाहनांनी इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत होता.

'सुट्टी संपल्याने पालीवरून शिरूरला कामावर जाण्यासाठी निघालो होतो. पालीला तब्बल 2 तासांनी खोपोली फाट्यावर जाण्यासाठी खाजगी वाहन मिळाले. तिथून वाट पाहिल्यावर लोणावळ्यापर्यंत खाजगी वाहन मिळाले. त्यांनी खूप पैसे देखील घेतले. त्यानंतर लोणावळ्याला पीएमटीमध्ये बसून पुढील प्रवास केला. 4 तासांच्या प्रवासासाठी तब्बल 9 तास लागले. कामावर पोहचण्यास खूप उशीर झाला. वेळ व श्रम तर लागलेच पण खूप गैरसोय देखील झाली.'

- संकेत खंडागळे, अभियंता, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

Ayub Pathan story in Balbharti Class 4 Marathi: बालभारतीच्या चौथीच्या मराठी पुस्तकात अय्युब पठाण यांच्या ‘कौतुकाची थाप’ला स्थान

SCROLL FOR NEXT