Passenger Railway sakal
सातारा

Railway Ticket : रेल्वे बोर्डाने पॅसेंजर गाड्यांचे दर केले कमी; पूर्वीचे दर होणार लागू

रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर आज पासून पूर्ववत करण्यात आले आहेत.

हेमंत पवार

कऱ्हाड - रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांना असलेले दर आज पासून पूर्ववत करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मिरज सांगली सातारा पर्यंत धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्वीचे दर लागू होणार आहेत.

कोवीड काळानंतर रेल्वेने तिकीट दरात मोठी वाढ केली होती. हे दर कमी करण्यासाठी देशभरातून विविध रेल्वे प्रश्न मांडणारे संघटना, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली होती. यास अनुसरून केंद्रीय रेल्वे बोर्डाने काल उशिरा सर्व विभागांना दर पुर्ववत करण्याच्या सूचना देऊन त्याची अंमलबजावणी तातडीने आज पासून करण्याबाबत सूचित केले होते.

त्यानुसार आज पासून सर्व पॅसेंजर गाड्यांना पूर्ववत दराप्रमाणे तिकिटे उपलब्ध करण्यात येत आहेत. कऱ्हाड ते कोल्हापूर आतापर्यंत असणारे 60 रुपयाच्या ऐवजी आता फक्त 30 रुपयेमध्ये प्रवास करता येईल. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी केले आहे.

प्रवासाचे ठिकाण तिकीट दर

  • कऱ्हाडवरुन कोल्हापूर - ३० रुपये

  • कऱ्हाड - हातकणंगले - २५ रुपये

  • कऱ्हाड - मिरज - २० रुपये

  • कऱ्हाड - सांगली - २० रुपये

  • कऱ्हाड - किर्लोस्करवाडी - १० रुपये

  • कऱ्हाड - भिलवडी - १५ रुपये

  • कऱ्हाड - ताकारी - १० रुपये

  • कऱ्हाड - कोरेगाव - १५ रुपये

  • कऱ्हाड - रहीमतपूर - १० रुपये

  • कऱ्हाड - सातारा - २० रुपये

  • कऱ्हाड - वाठार - २५ रुपये

  • कऱ्हाड - निरा - ३० रुपये

  • कऱ्हाड - लोणंद - ३० रुपये

  • कऱ्हाड - जेजूरी - ३५ रुपये

  • कऱ्हाड - पुणे - ४५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT