Koyna Dam esakal
सातारा

Don't Worry! महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' असलेल्या कोयनेत मुबलक पाणीसाठा

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयनेच्या शिवसागर जलाशयात (Koyna Shivsagar Reservoir) मे महिना संपत आला, तरी समाधानकारक पाणीसाठा असून, या चांगल्या पाणीसाठ्यामुळे बामणोली, कांदाटी व तापोळा भागातील जीवन सुसह्य झाले आहे. (Plenty Of Water Available In Shivsagar Reservoir Of Koyna Dam Satara Marathi News)

कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या दोन्ही काठांवर जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांतील अनेक गावे वसली आहेत.

कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या दोन्ही काठांवर जावळी व महाबळेश्वर (Jawali and Mahabaleshwar) तालुक्‍यांतील अनेक गावे वसली आहेत. या गावांचे दळणवळण प्रामुख्याने जलाशयातील बोटींवर चालते. विशेषतः दुर्गम कांदाटी खोऱ्यातील लोकांना बामणोली, तापोळा आदी ठिकाणी येण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. शिवसागर जलाशयाची पाणीपातळी खाली गेली, की या भागातील लोकांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते. या भागात तापोळ्याच्या पलीकडून रस्ता असला, तरी कच्चा व खूप वेळ लागणारा रस्ता नकोसा वाटतो.

कांदाटी खोऱ्यातील लोकांना आकल्पे, लामज गावांमधून रत्नागिरी जिल्ह्यात बाजारपेठेसाठी जावे लागते. सकाळ, संध्याकाळी एकच फेरा असणारी एसटी सेवा कोरोना व लॉकडाउनमुळे (Coronavirus) बंदच असते. अशा परिस्थितीत लोकांना जलवाहतुकीशिवाय पर्याय नाही. दोन वर्षांपासून या दिवसात कोयनेचे पात्र कोरडे पडून जुनी घरे, मंदिरे, पुलांचे अवशेष दिसायचे; पण यावर्षी हे अवशेष दिसण्याची शक्‍यता कमीच आहे. समाधानकारक पाणीसाठ्याने बामणोली, तापोळा या बाजारपेठांच्या गावांना जोडणारी बोट वाहतूक सुरू असल्याने लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे.

Plenty Of Water Available In Shivsagar Reservoir Of Koyna Dam Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT