सातारा

कुणी पक्का रस्ता देता का पक्का रस्ता..!

दीपक मदने

सांगवी (जि. सातारा) : सोमंथळी परिसरात रस्ते व ओढ्यांवरील पुलांची दुरवस्था ही कायम असल्याने कुणी पक्का रस्ता देता का पक्का रस्ता... असे ग्रामस्थ आक्रोशाने बोलत आहेत. सोमंथळी, कांबळेश्वर, सांगवी, विडणी, राजाळे अलगुडेवाडी, धुळदेव परिसर हा बागायती पट्ट्यात असल्याने या परिसरात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. ऊस व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या परिसरामध्ये पशुधन मोठे असल्यामुळे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दरडोई या परिसरातून एक लाख लिटर दूधनिर्मिती होते. मात्र, वाहतूक करण्यास दूध उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

रस्त्यांची अवस्था पाहिली की "इकडे आड अन्‌ तिकडे विहीर' अशी बनलेली आहे. प्रवाशांना वाहतूक करणे फारच त्रासदायक बनते. आधीच खराब रस्ते आणि तेही अरुंद असल्यामुळे या रस्त्यांवर सातत्याने वाहनचालकांमध्ये तू तू.. मैं मैं.. होत असते. परिसरातील सोमंथळी येथील ओढ्यावरील पुलाबाबत तर बोलायची सोय राहिली नाही. बांधकाम विभागाचे कित्येक वेळा पुलाचे काम केले. पहिल्याच पुरात वाहून जायचे, हे समीकरण कित्येक वर्षांपासूनचे आहे. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार स्थानिक ग्रामस्थांनी विनवणी करूनही हे अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या परिसरातील पुलांची तसेच रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान, कित्येक वर्षे उलटली तरी पक्के रस्ते, मजबूत पूल का बांधले जात नाहीत? केवळ लालसेपोटी निकृष्ट बांधकाम केले जाते. यामुळे रस्ते व पूल लवकरच खराब होत आहेत. बांधकाम विभागाने कारभारात सुधारणा करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सोमंथळी ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद अहिवळे यांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT