सातारा

व्यावसायिक वाहनधारकांचा 'फायनान्स' कार्यालयावर मोर्चा

उमेश बांबरे

सातारा : फायनान्स कंपन्यांकडून वाहनांसाठी कर्ज घेतलेल्या वाहनधारकांना कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, कर्जावरील व्याज माफ करावे, उर्वरित कर्जाच्या हप्त्यांची पुनर्बांधणी करावी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनधारकांनी आज जिल्हा ट्रान्स्पोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या माध्यमातून विविध फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदनही दिले. या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास राज्यातील सर्व व्यावसायिक वाहने बॅंक व फायनान्स कंपन्यांकडे जमा करू, असा इशाराही या वेळी दिला. 

सातारा जिल्हा ट्रान्स्पोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी व सचिव धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज व्यावसायिक वाहनधारकांनी आंदोलन केले. यामध्ये आयसीआयसीआय बॅंक, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी, एचडीबी फायनान्स सर्व्हिसेस, इंडोसंड बॅंक, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनी आदींच्या कार्यालयासमोर व्यावसायिकांनी जमून निदर्शने केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

भारीच की! बटाटा संशोधन केंद्रामुळे शेतक-यांचे आर्थिक बजेट सुधारणार
 
निवेदनात म्हटले, की लॉकडाउन पूर्णपणे न उठल्याने व्यवसाय सुरू झालेला नाही. त्यामुळे विविध बॅंका व फायनान्स कंपन्यांचे कर्जाच हप्ते वाहनधारक भरू शकलेले नाहीत. आता सप्टेंबरमध्ये कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. वाहने उचलून नेण्याच्या धमक्‍याही देऊ लागले आहेत. याविरोधात विविध वाहतूक संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज जिल्हा ट्रान्स्पोट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली. फायनान्स कंपन्यांकडून वाहनांसाठी कर्ज घेतलेल्या वाहनधारकांना कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, कर्जावरील व्याज माफ करावे, उर्वरित कर्जाच्या हप्त्यांची पुनर्बांधणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या. 

या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने आम्ही बॅंक व फायनान्स कंपन्यांकडे जमा करू, असा इशारा ही या वेळी जिल्हा ट्रान्स्पोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशनने दिला आहे. या वेळी अक्षय गवळी (सावकार ट्रॅव्हल्स), बाबा शेख (साई ट्रॅव्हल्स), धनंजय निकम (पुष्कराज ट्रॅव्हल्स), हर्षद पवार (हर्षद ट्रॅव्हल्स), एकनाथ जाधव (अष्टविनायक ट्रॅव्हल्स), हर्षद पवार (अद्वेत ट्रॅव्हल्स), जुबेर शेख, आमीर शेख, ताहीर शेख (बबलूराज ट्रॅव्हल्स), अण्णा वायदंडे (रेखा ट्रॅव्हल्स), समीर दोडमनी (रेणुका ट्रॅव्हल्स), अजित पाटील (वक्रतुंड ट्रॅव्हल्स), जितेंद्र वंजारी (जेसी वंजारी ट्रॅव्हल्स), दादासाहेब शिर्के, रमेश कदम (ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स), महेश जाधव (चिंतामणी ट्रॅव्हल्स) आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT