Ajit Pawar NCP esakal
सातारा

NCP Crisis : पुन्हा नव्याने संघटना उभारण्यासाठी अजितदादा मैदानात; कोण-कोण लागणार गळाला? उत्सुकता शिगेला

बालेकिल्ल्यात पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी होताना कोण अजित पवार गटात सहभागी होणार? याची उत्सुकता

सकाळ डिजिटल टीम

सातारा पक्षाचा बालेकिल्ला असून, आता अजितदादा स्वत: जिल्ह्यात लक्ष घालणार असल्याने जिल्ह्यातील कोण कोण त्यांच्या गळाला लागणार, याची उत्सुकता आहे.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) राज्यात नव्याने संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर दिली आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी होताना कोण अजित पवार गटात सहभागी होणार? याची उत्सुकता आहे.

अजित पवार हे ३७ आमदारांसह शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उभी फूट पडली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांच्यासह वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटणसह इतर तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी दादांच्या गटात सहभागी झाले.

आता राष्ट्रवादीची विभागलेली ताकद पुन्हा वाढविणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकांसाठी हे उपयुक्त असल्याने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यात राष्ट्रवादीची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हानिहाय नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

सातारा पक्षाचा बालेकिल्ला असून, आता अजितदादा स्वत: जिल्ह्यात लक्ष घालणार असल्याने जिल्ह्यातील कोण कोण त्यांच्या गळाला लागणार, याची उत्सुकता आहे. सध्या दोन आमदार व एक खासदार हे खासदार शरद पवार यांच्या गटासोबत आहेत. तसेच अद्यापही प्रमुख पदाधिकारी ही त्यांच्याचसोबत आहेत. त्यामुळे यातील कोण दादांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार, हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT