सातारा

फलटणच्या राजघराण्याने कोरोनाग्रस्तांसाठी दिला "विक्रम-विलास' बंगला

किरण बाेळे

फलटण शहर : फलटण तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगवी (ता. फलटण) येथील स्वतःचा अलिशान बंगला कोरोना सेंटर म्हणून देण्याची तयारी दाखविली आहे. त्यांनी तसे पत्र प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिले आहे.
 
फलटण शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. अशातच ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने, रघुनाथराजेंनी ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांवर उपचारासाठी "विक्रम-विलास' हा बंगला देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामधील खालचा मजला स्त्रियांसाठी व वरचा मजला पुरुषांसाठी देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले आहे.

टेलर बर्ड अर्थात शिंपी पक्षाच्या अंड्यांची घ्या काळजी!, विणीचा काळ अंतिम टप्प्यात 

पुढच्या रविवारपर्यंत सहकार्य करा, आम्हांला लाेकं महत्वाची पैसे नाही : व्यापारी महासंघ
 
यापूर्वी रघुनाथराजेंनी तालुका पिंजून काढत गावोगावी प्रत्यक्ष जाऊन लोकांना धीर दिला होता. बाजार समितीच्या माध्यमातून लॉकडाउन काळात शहरात व गावोगावी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषधोपचाराची विशेष सोय केली होती. बाजार समितीतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, आडते, हमालांना मोफत मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले होते. लॉकडाउन काळात अडकलेल्या परप्रांतीयांना तमिळनाडूत स्वखर्चाने बसद्वारे पाठविले होते.

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची 14 दुकानांवर कारवाई 

बेड मिळत नसल्याने कोरोनाग्रस्त काढताहेत आशांवर राग!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT