सातारा

चुलीवरचे जेवण! 'सह्याद्री'त आंदाेलनाचा इशारा

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सुरू केलेली शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत सवलतीची घरगुती गॅस योजना वन्यजीव विभागाने बंद केली असून, ग्रामस्थांवर जाचक अटी व बंधने लादण्याचे काम सुरू केले आहे. या धोरणाच्या विरोधात रासाटी येथील कुंभार कुटुंबीय मंगळवारी (ता. नऊ) ग्रामपंचायतीसमोर "चुलीवरचे जेवण' हे अभिनव आंदोलन करणार असल्याची माहिती अमिषा कुंभार यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. 

दोन वर्षांपासून रासाटीतील नागरिकांना सवलतीच्या दरात घरगुती गॅस देण्यात येत होते. यामुळे ग्रामस्थ समाधानी होते. मात्र, तीन महिन्यांपासून योजना बंद झाल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. वन्यजीव विभागाच्या सर्व अटी मान्य करूनही रासाटी ग्रामपंचायतीची अवस्था "आ बैल मुझे मार' अशी झाली आहे. निधीअभावी योजना अनेक महिने बंद आहे. 

गॅस नसताना जळण गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असली, तरी वन्यजीव विभागाने कुऱ्हाडबंदी व जाचक अटी घातल्या आहेत. यामुळे मेटाकुटीला आलेल्या कुंभार कुटुंबीयांनी याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी चुलीवरचे जेवण करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

जाणून घ्या काेणत्या गावांची सरपंच निवड लांबणीवर गेली आहे 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT