Sambhaji Bhide esakal
सातारा

उदयनराजेंच्या भेटीनंतर भिडे गुरुजी सेना नेत्याच्या भेटीला

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांची त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी जाऊन भेट घेतली. काल खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) बोटीतून जाऊन मंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले.

खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) व सातारा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात काल मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हाती. लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीतून काय घडणार याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी भिडे गुरुजी यांना विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्याचे टाळले. सुमारे तासभर दोघात बंद खोलीत चर्चा झाली.

Eknath Shinde

या चर्चेत नेमके काय मुद्दे होते, याची उत्सुकता आता ताणली आहे. मात्र, मंत्री शिंदे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले आहे. बंद खोलीतील चर्चेनंतर मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावण्यात आले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT