Sangali Cotton  esakal
सातारा

Sangali : हंगामाच्या सुरुवातीलाच पांढरे सोने रुसले

चांगल्या प्रतीच्या कापसालाच हमीभाव मिळतो

सकाळ डिजिटल टीम

मिरजगाव : मागील वर्षी दहा हजारांपर्यंत मजल मारलेल्या कापसाच्या भावात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मिरजगाव परिसरात कापसाची खरेदी सध्या सुरू झाली असून, बाजारभाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

चांगल्या प्रतीच्या कापसालाच हमीभाव मिळतो. गुणवत्तेने त्यापेक्षा कमी असणाऱ्या कापसाला आणखी कमी भाव मिळतो. सद्य स्थितीला थोड्याफार प्रमाणावर कापसाची आवक व्यापाऱ्याकडे सुरू आहे. यंदा कापूस लागवडी उशिरा झाल्या. पावसात मोठे खंडही पडले. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जवळपास ४५ दिवस पिकाला पोषक

असा पाऊस पडला नाही. त्यामुळे कापूस उत्पादक सर्वच भागात कापूस पिकाला फटका बसला. त्यामुळे कापसाची उत्पादकता आणि गुणवत्ताही कमी झाली. खराब वातावरणामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे परिसरात बोंडसड व बोंडआळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट झालेली दिसून येत आहे. २०२१ च्या एप्रिल, मे महिन्यात कापसाचे भाव १५ हजार रुपयांपर्यंत गेले होते.

मागील अडीच वर्षांत कापसाचे भाव निम्म्यावर आले आहेत, तर दुसरीकडे लागवड खर्च दुपटीने वाढला आहे. कापसाच्या दरातील चढ-उतारामुळे कापूस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

आकडेवारी

शासकीय हमीभाव - (प्रतिक्विंटल)

मध्यम धागा : ६ हजार ६२० रुपये

लांब धागा : ७ हजार २० रुपये

खाजगी बाजारपेठ - (प्रतिक्विंटल)

मध्यम धागा : ६ हजार ते ७ हजार रुपये

लांब धागा : ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपये

पांढऱ्या सोन्याची चोरी

अत्यल्प पावसामुळे आधीच पावसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच शेतातील कापसाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे.हताश झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर शेतातील कापसाची राखण करण्याची वेळ आली आहे.

सध्या कापसाला उठाव नाही. सुतगिरण्यांकडून कापूस गाठींचा उठाव कमी होत आहे. तसेच सरकीचेही भाव कमी झाले. सरकीवर खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचा दबाव आहे. कापसातील ओलावा कमी झाल्यानंतर किमान भावातही सुधारणा झालेली दिसेल.

- दादासाहेब बांदल व राहुल पवार, कापूस व्यापारी

पूर्णपणे वाळलेल्या कापसालाच चांगला बाजारभाव असल्याने, शेतकऱ्यांनी वाळल्यानंतरच कापसाची वेचणी करावी. ओला कापूस काढणीची घाई करू नये. खाजगी व्यापाऱ्याकडे माल विकताना वजन काटा तपासून घ्यावा.

- अमरजित अडसूळ, मंडळ कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT