Satara 
सातारा

कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी "या' शहरात करावे लागते 15 तासांचे वेटिंग!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असताना शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरातील तीन कोविड हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये मृत होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात 90 दिवसांत 92 जणांवर दहन, तर दहा जणांवर दफन विधीचे अंत्यसंस्कार झाले आहेत. सध्या तर कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी तब्बल 12 ते 15 तासांचे वेटिंग करावे लागत आहे. अंत्यसंस्कारसाठी वाढलेला ताण लक्षात घेऊन पालिकेला अत्यंत अवघड स्थितीशी सामना करावा लागतो आहे. 

शहरात कृष्णा, सह्याद्री व शारदा अशा तीन कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यात मृत होणाऱ्यांवर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी पालिकेने सात पथकांची नेमणूक केली आहे. कऱ्हाडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढतो आहे. मागील आठवडाभरात तर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी तब्बल 12 ते 15 तासांचे वेटिंग करण्याचे वेळ आली. ही गोष्ट अत्यंत भयावह आहे. त्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. पालिकेने त्यासाठी डिझेल किंवा विद्युत दाहिनी बसविण्याचा पर्याय पुढे आला. मात्र, त्या दोन्ही गोष्टी फारच खर्चिक आहेत. त्याशिवाय तेथे दहनालाही कालावधी जास्त जातो आहे. त्यामुळे तो पर्याय मागे पडतो आहे. पालिका सध्या तरी स्वतंत्र कोविड स्मशानभूमी उभारण्याच्या मानसिकतेत आहे. त्या दृष्टीने लवकरच अंतिम विचार होण्याची गरज आहे. 

मृत्यू दर वाढतोय 

कोरोनाग्रस्ताचा मृत्यूचा दर वाढतो आहे. शहरात 11 एप्रिलला पहिल्या तर नऊ दिवसांत दुसऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्याच्यावर पालिकेतर्फे अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर एक महिन्याने तिसऱ्या कोरोनाबाधिताचे मृत्यू झाला. 18 मे रोजी झालेल्या तिसऱ्या मृतावरही अंत्यसंस्कार झाले. सहा जूनपर्यंत तीन दिवसांच्या फरकाने एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत होता. 18 जूननंतर मृतांचा आकडा वाढला. एका दिवसात दोन जणांचे मृत्यू होऊ लागले. क्वचितच एका दिवशी एक मृत्यू व्हायचा अन्यथा रोज किमान दोन मृतदेह पालिकेकडे अंत्यसंस्काराला येऊ लागले. 21 जुलैनंतर मात्र ती स्थिती अधिक बिकट झाली. रोज दोघांचा मृत्यू होत होत त्यात वाढ होऊन मृतांची संख्या तीनवर गेली. दोन दिवासांच्या फरकाने तीन मृतदेह येऊ लागले. दहा ऑगस्टला चार, तर 11 ऑगस्टला पाच जणांचे मृतदेह आले होते. मृतांचा वाढता दर शहराला व पालिकेला धोकदायक आहे. पालिकेला संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठीच जागा नाही, अशी अवस्था झाली आहे. 

""कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना दुसऱ्या मृतदेहाला वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. येत्या दोन दिवसांत ती पर्यायी व्यवस्था उभा केली जाणार आहे.'' 
- रमाकांत डाके, 
मुख्याधिकारी, कऱ्हाड 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

Viral Video : फॅन मैदानावर लाडक्या खेळाडूला भेटायला आला अन् कॅप चोरून पळाला; KKR च्या खेळाडूसोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

FDA Crime : 'गोरस भंडार'वरील कारवाई मागे घेण्याच्या हालचाली, पूर्वसूचना न देता FDAने केलं सील; हायकोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT