डेंगीचा आजार 
सातारा

कोरोनापाठोपाठ आता घोंघावतोय नवा धोका...

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनापाठोपाठ येणाऱ्या पावसाळ्यात येणार्‍या डेंगीच्या साथीची भीती लक्षात घेऊन कऱ्हाड पालिकेने त्‍याच्‍या प्रतिबंधासाठी तयारी केली आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लवकरच घरोघरी सर्व्हे केला जाणार आहे, अशी पालिकेच्‍या प्रभाग सभेत देण्‍यात आली. 

पालिकेने मागील वर्षीही नियोजनपूर्वक डेंगीच्या साथीवर नियंत्रण मिळवले होते. शहराबरोबर जिल्ह्याच्याही काही भागात फैलावलेल्या साथीची स्थिती यंदाही निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने प्रभाग समितीच्या सभेत डेंगीवर चर्चा घडवली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. 

पालिकेच्या प्रभाग समितीची सभा सामाजिक अंतराचे नियम पाळून येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात पार पडली. बैठकीस पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, पालिकेच्या समित्यांचे सभापती, सर्व नगरसवेक उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांसह प्रामुख्याने कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या नियमावलीची चर्चा झाली. शहरात त्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नियम पाळल्याशिवाय कोरोना रोखला जावू शकणार नाही, असे स्पष्ट करून पोलिस निरीक्षक पाटील यांनी नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले. शहरात संचारबंदीच्या अनुषंगाने केलेली नियमावली शहरातील व्यापारी, नागरिकांनी पाळावी, यासाठी नगरसवेकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डांगे यांनी केले. 

कोरोनाबरोबर पावसाळ्यात डेंगीच्या आजाराची भीती आहे. त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र आराखडा करण्याचीही चर्चा यावेळी झाली. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी विषय मांडला. कोरोनासह आगामी काळात डेंगीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पालिका विशेष प्रयत्न करत आहे, असा खुलासा यावेळी झाला. त्यामुळे यापुढच्या काळात डेंगीसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. 

दरम्यान, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची पहिली बैठकही लवकरच घेतली जाणार आहे. त्यासोबत नागरी सुविधा केंद्रातर्फे डेंगीच्या अनुषंगाने घरोघरीही सर्व्हे हाती घेतला जाणार आहे. त्याचवेळी जागृतीही केली जाणार असल्याचे जाहीर केले. 
 

डेंगी रोखण्यासाठी हे करा... 
1) डेंगीचा डास स्वच्छ पाण्यावर वाढतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवू नका. 
2) फ्रीज स्वच्छ करा. फ्रीजखालचे साठलेले पाणी नियमित ओतून द्या. 
3) एक दिवस कोरडा पाळा. 
4) घराच्या परिसरातही पाण्याची डबकी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तोच अपरकट, तेच पुढे येऊन षटकार खेचणे... वीरेंद्र सेहगावच्या लेकाची 'सेम टू सेम' बॅटिंग; आर्यवीरच्या १७३ धावांचा Video Viral

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

SCROLL FOR NEXT