सातारा

सरपंचपदाच्या निवड स्थगितीत कऱ्हाड तालुक्यातील गावाचा समावेश

सिद्धार्थ लाटकर/हेमंत पवार

सातारा - कऱ्हाड : मुंबई उच्च न्यायालयाने सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीस शुक्रवारी (ता.५) स्थगिती दिली आहे. आपल्या गावातील सरपंच निवडी पुढे जाणार की काय अशा चर्चा गावोगावच्या पारावर आज रंगल्या. यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीवर, आरक्षणावर आक्षेप आहे, त्या तालुक्याचा समावेश आहे अशीही चर्चा रंगू लागली. दरम्यान सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे हे समूज शकले नसले तरी कराड तालुक्यातील पोतले ग्रामपंच्यातीच्या सरपंच निवडीस स्थगिती मिळाली आहे. याबाबत तहसलीदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांनी ई-'सकाळ'शी बाेलताना दुजाेरा दिला. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या आठ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत नवीन सरपंच निवडी हाेणार हाेत्या. परंतु या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.५) स्थगिती दिली. निवडीचा पूर्वनियोजित कार्यक्रम स्थगित करून, येत्या नऊ तारखेला पहिल्यांदा सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला नवीन सरपंच निवडावेत, असेही या आदेशात नमूद केले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमधून नवीन सरपंच निवडींना आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या हाेत्या. या सर्व याचिकाकर्त्यांनी येत्या आठ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आयोजिल्या सरपंच निवडीला स्थगित करण्याची मागणी केली हाेती. या याचिकांवर शुक्रवारी (ता.५) न्यायमूर्ती एस.. जे. काथावाल्ला आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

मारिया आम्हांला माफ कर, आम्हीही सचिन तेंडूलकरला ओळखत नाही

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पाठीशी अजित पवार; कुणाच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही

आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदयनराजे करणार ओपन हार्ट सर्जरी?

कराड तालुक्यातील पाेतले ग्रामपंचयातीच्या सरपंच निवडीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निवडी बाबत ऋतुजा बाळासाहेब जगताप यांनी याचिका दाखल हाेती.  या ग्रामपंचायतीची सरपंच निवड पुढे गेल्याचे तहसीलदार वाकडे यांनीही सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT