जिल्‍हाधिकारी शेखर सिंह 
सातारा

रिक्तपदांच्या भरतीत अन्‍याय होणार नाही

सकाळ वृत्तसेवा

पाटण (जि. सातारा) :  कोरोनासह नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटण तालुक्‍याचा पाहणी दौरा केला. तहसील कार्यालयात त्यांनी तालुक्‍यातील स्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी उपस्थित होते. 

आढावा बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाटण तालुका दुर्गम आहे. खातेदारांची संख्या जास्त आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची रिक्तपदे प्रत्येक विभागात जास्त आहेत. एकूण रिक्तपदांबाबत माहिती घेण्याबरोबरच नवीन नोकरभरतीत पाटणवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोरोना महामारीच्या कालावधीत तालुक्‍यातील जनता, शासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केल्याने मुंबई-पुणे यांसारख्या शहरांतून मोठ्या प्रमाणावर लोक येऊनसुद्धा कोरोना नियंत्रणात राहिला. 

कोयना धरणात 30 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. यावर्षी हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार करता यावर्षीचे आपत्कालीन नियोजन काय असेल, याबाबत विचारणा केली असता गतवर्षीच्या पूरपरिस्थितीचा मी तीन वेळा आढावा घेतला आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर पूररेषेतील प्रत्येक कुटुंबाचे स्थलांतर करण्याबाबतचे नियोजन केले आहे. गतवर्षी दहा ते बारा दिवसांत मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे निर्णय घेणे अवघड झाले होते. मात्र, अचानक निर्माण झालेल्या अडचणी यावेळी उद्‌भवणार नाहीत, त्यासाठी प्रशासन दक्ष असेल. धरणातून पाणी सोडताना योग्य निर्णय घेतले जातील,असेही जिल्‍हाधिकार्‍यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final Live Telecast: आज ठरणार विश्वविजेता! सामना किती वाजता आणि फ्री लाईव्ह कुठे पाहायचा? वाचा पूर्ण डिटेल्स

Latest Marathi News Live Update : वकील महिलेला न्यायालय परिसरात मारहाण

Operation Sindoor Book Review : भारतीय संरक्षण दलांची अभूतपूर्व शौर्यगाथा

New Marathi Book : ‘तर्कतीर्थां’च्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र धांडोळा

The Roses Movie Review : प्रेमाच्या गुलाबाबरोबर काट्याची नर्मविनोदी कथा

SCROLL FOR NEXT