सातारा

सातारा : कर्तव्यदक्ष हवालदार संजय साबळे पून्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार संजय साबळे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहाय्यता निधीस 11 हजार रुपयांची मदत केली आहे.
 
पाेलिस दलात कार्यरत असलेले साबळे हे अत्यंत शिस्तप्रिय आहेत. वाहतुकीची नियमन करताना त्यांची नेहमी युवा वर्गाशी हमरीतुमरी हाेत असते. युवा पिढी ही देशाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे युवा वर्गाने शिस्तीत वाहन चालवावे, जाेर जाेरात हाॅर्न वाजवून नागरिकांना त्रास देऊ नये यासाठी मी त्यांना अडवून सांगताे. त्यामुळे काही वेळेला वाद हाेतात परंतु त्यात मला वाईट वाटत नाही असे साबळे नेहमी सांगतात. नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध अभिनेते अमिर खान यांच्या वाहनावर देखील काही वर्षांपुर्वी साबळे यांनी कारवाई केली हाेती. सातारा शहरातील काेणत्याही पाॅईंटवर त्यांची नेमुणक असाे त्यांच्या शिस्तीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. 

साबळे यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त कुटुंबीयांसमवेत जाऊन 11 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जमा केला. कोरोनाच्या संकटाच्या काळात साबळे यांनी केलेल्या मदतीचे पोलिस विभागात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे टिकटाॅक फेम असलेल्या साबळे यांचे युवा वर्ग देखील त्यांचे व्हिडिआे पाेस्ट करुन नाद नाय दादांचा असे म्हणत आहेत.

चक्रीवादळाचे कारण... चक्रे फिरली राजकारणाची!

...अन्‌ आमचं सारं गणितच बिघडलं!

महाराष्ट्रात जतन केला आहे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा वटवृक्ष

शिधापत्रिका नसलेल्यांसाठीही आता गुड न्‍यूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Restrictions: पुण्यात ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; १४ दिवस कलम ३७ लागू, कधीपासून आणि का? जाणून घ्या...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT