Satara sakal
सातारा

Satara : तारळ्यातील स्वच्छतागृह असून अडचण...

बस स्थानकातील स्थिती; नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय, नेतेमंडळींचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

तारळे : सहा वर्षांपूर्वी येथील बस स्थानकाचे नूतनीकरण झाले. त्याचवेळी स्वच्छतागृहाचेही नूतनीकरण करणे गरजेचे होते. मात्र, ते झाले नाही. तेव्हापासून महामंडळ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. सद्य:स्थितीत तेथील अवस्था विदारक बनली असून स्वच्छतागृह अखेरची घटका मोजत आहे. अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक राजकीय पदाधिकारीही या प्रश्‍नी डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत. मात्र, गैरसोयीमुळे प्रवासी व लोकांतून संताप व्यक्त होत आहे.

सद्य:स्थितीत तेथे सर्वत्र दलदलीचे व झाडीचे साम्राज्य आहे. पुरुषांना लघुशंकेसाठी उघड्यावरच जावे लागते. स्वच्छतागृहाचा रस्ताही वेली, झुडपांनी वेढला आहे. आतमध्येही अस्वच्‍छता आहे. शौचालय बंद अवस्थेत आहेत. परिसरात दुर्गंधी आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. या गैरसोयीने प्रवाशांची मोठी कुचंबना होताना दिसते. महिला प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. अनेक तक्रारी व मागणी करूनही त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक नेतेमंडळींनाही लक्ष द्यायला वेळी नाही.

येथे दोन्ही गटांचे पुढारी आहेत. पालकमंत्र्यांचे जवळीक असणारे नेतेही आहेत. तरीही गेली अनेक वर्षे स्वच्छतागृहचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे येथील पुढारी नेमके राजकारण कशाचे करतात? मोठे गाव, मोठी बाजारपेठ, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. दररोज हजारो लोकांचा ये-जा असते. मात्र, या लोकांना लघुशंकेसाठी आडोसा शोधावा लागत असल्याने नेतेमंडळींचे अपयश दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'मोदींच्या शब्दांवर आता कुणाचाच विश्वास नाही'; के. सी. वेणुगोपाल यांचा घणाघात

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT