satara sakal
सातारा

Satara : ढेबेवाडी बस स्थानकात प्रवाशांची घोषणाबाजी

दुर्गम डोंगराळ जिंती खोऱ्यातील अनियमित वाहतूक सेवेमुळे संताप

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी : दुर्गम डोंगराळ भागातील अनेक गावांची एसटी बससेवा अचानक विस्कळित होत असल्याने जिंती विभागातील प्रवाशांनी येथील बस स्थानकात उभ्या अन्य बसचा ताबा घेत खाली न उतरण्याचा पवित्रा घेतला. यावेळी पोलिसांनी धाव घेत प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्नही केला. परंतु, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार मागणी करूनही बससेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजीही केली.

दुर्गम व डोंगराळ गावातील विद्यार्थी व नागरिकांसाठी उपयुक्त कऱ्हाड-ढेबेवाडी-जिंती मार्गावरील एसटीतील अनियमितता दूर करण्याची मागणी वारंवार करण्यात येत असली तरी त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. अचानक फेरी रद्द केल्यावर प्रवाशांचे मोठे हाल होते.

भोसगाव, मराठवाडी, उमरकांचन, सावंतवाडी, कोळेकरवाडी, जिंती व त्या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांच्या दळणवळणासाठी ढेबेवाडी-जिंती मार्गावरील बससेवेचा आधार आहे. एसटी सेवेत नियमितता नसल्याने बाहेरगावी शिक्षणास जाणारे विद्यार्थी, नागरिक, उपचारासाठी दवाखान्यात जाणारे रुग्ण, नोकरदार आदींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिंती खोऱ्यातील विविध दुर्गम वाड्या-वस्त्यांतून आठवडा बाजारासाठी आलेल्या नागरिकांचा बस स्थानकात पुन्हा संतापाचा उद्रेक झाला.

स्थानकात उभ्या अन्य एसटी बसमध्ये बसून वाहतूक रोखून धरण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी धाव घेऊन प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्नही केला. एसटीच्या आधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. मात्र, प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी बोलताना रमेश पाटील, बापूराव पाटील, डी. जी. मोहिते, युवराज पाटील, कांता पाटील, सोनाबाई मणेकर, सुलाबाई पवार आदी प्रवासी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

YouTube Shorts पाहण्याचं व्यसन लागलंय? मिनिटात मिळेल सुटका; गुगलकडून '0 Minute' चा पर्याय..हे नेमकं कसं वापरायचं पाहा

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

SCROLL FOR NEXT