karad 
सातारा

हवामानातील बदलातून "हा' आला रोग

विलास खबाले

उंडाळे (जि. सातारा) ः शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे हुकमी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसावर यावर्षी हवामानातील बदलामुळे लोकरी माव्याचे संकट आले असून, परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात कृष्णा कोयना नदीकाठ कऱ्हाड दक्षिण विभागात वाकुर्डे योजना, नदी जोड प्रकल्प, डोंगरी भागात झालेले तलाव, धरणे व जलंधारणाच्या कामांमुळे कऱ्हाड तालुक्‍यातील बहुतांश क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. या पिकातून शेतकऱ्यांना हमखास एकरकमी उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल इतर पिकांपेक्षा ऊस शेतीकडे वळला आहे. अशातच चालू हंगामात कऱ्हाडसह तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने व उन-पावसाचा खेळ राहिल्याने हवामानात दमटपणा असल्याने उसावर यावर्षी लोकरी माव्याचे संकट येऊ लागले आहे. तालुक्‍यातील उसावर सध्या लोकरी माव्याने सुरुवात केली असून, हा लोकरी मावा वाऱ्याच्या साह्याने अन्य उसावरही जाऊन तो इतरत्र वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक उत्पन्न घटण्याची भीती वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे. 

कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू व्हायला अजून भरपूर वेळ असून, 2020-21 च्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होणार, की उशिरा याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. तोपर्यंत ऊस शेतातच राहणार असल्याने शेतकरी चितेंत आहे. उंडाळे येथे तेजदीप कृषी विकास संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उसावर आलेल्या लोकरी माव्याची पाहाणी करून संस्थेचे अध्यक्ष विनायक पाटील, प्रवीण माने, सुनील शेवाळे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT