सातारा

दिवाळीच्या ताेंडावर कोविड सेंटरच्या 99 कर्मचाऱ्यांची कपात

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना रुग्णांवर उपचार व संशयित रुग्णांना आयसोलेशनसाठी सुरू करण्यात आलेली 14 कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत. या कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. काही कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने 99 कर्मचाऱ्यांची कपात केली असून, 130 कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवण्यात आले आहे.
 
मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने बाधित रुग्णांसाठी जिल्हाभरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. मात्र, सद्यःस्थितीत हळूहळू रुग्णांची संख्या नियंत्रित होत असल्याने काही सेंटर बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढताना कोविड सेंटरमध्ये शासनाने तात्पुरत्या स्वरूपात 229 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

कॉंग्रेसचा हात बळकट करण्याचे नेत्यांपुढे आव्हान

मात्र, आता काही सेंटर बंद करण्यात आल्याने 99 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, तर आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, वॉर्ड बॉय आदी विभागातील कर्मचारी कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील काही महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

प्रथम नियुक्ती केलेल्यांना प्राधान्य 

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये प्रथम कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये ठेवण्यात आले आहे, तसेच ज्या तालुक्‍यातील सेंटर बंद केली आहेत. त्याठिकाणचे कर्मचारी जवळील कोरोना सेंटरमध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

व्वा रं पठ्ठ्या! स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत युवकाची बटाटा शेतीत विक्रमी कामगिरी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT