Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

शिक्षक संघटनेत चंगळवादी नेत्यांची चलती; बलवंत पाटलांची खरमरीत टीका

उमेश बांबरे

सातारा : शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "शिक्षकच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता' अशी भूमिका जाहीर करून गेल्या दहा वर्षांतील बॅंकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडत बॅंकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील यांनी सर्व शिक्षक सभासदांना "चला शिक्षक बॅंक वाचवूया' अशी साद घालत बॅंकेच्या संभाव्य निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

"चला शिक्षक बॅंक वाचवूया' या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन बलवंत फाउंडेशनच्या कार्यालयात झाले. या वेळी राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंगाडे, दत्तात्रय भांगे, एकल शिक्षक मंचचे जे. एन. जाधव, नंदकुमार कदम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रशांत मोरे, सेवानिवृत्त सभासद ध. नि. सावंत, चंद्रकांत बडदरे, वसंत धुमाळ, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत रसाळ उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, "शिक्षक संघटना हे शिक्षकांसाठी कुटुंबच असते आणि संघटनेने शिक्षकांना सन्मानही मिळवून दिला. तरीसुद्धा गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये संघटनेत काही चंगळवादी नेत्यांची चलती आहे. शिक्षक बॅंकेच्या कामकाजातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे शांत राहणे हा संयम नव्हे तर चंगळवादाला दिलेली मूकसंमती ठरेल. सहकाराच्या तत्त्वांचा अवमान होईल म्हणून जागृत गुरुजनांनी आता क्रांती घडवावी आणि त्याची सुरुवात यानिमित्ताने केली आहे.'' यावेळी शिवाजी शिवणकर, चंद्रकांत बडदरे यांचे मनोगत झाले. शांताराम शेळके यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर माने यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT