सातारा

फलटण तालुक्यात विजेचे खांबांची दूरवस्था, उघडे फ्यूजमुळे धाेकादायक स्थिती

दीपक मदने

सांगवी (जि.सातारा) ः आधीच लॉकडाउनमुळे जनता मेटाकुटीला आली असताना या काळात विजेची वाढीव बिले आकारली गेली आहेत. दुसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक दुहेरी संकटात आहेत.
 
फलटण तालुक्‍यातील काही गावांत असलेल्या विद्युत ट्रान्स्फार्मरची अवस्था दयनीय झाल्याने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाकलेले खांब, उघड्या फ्यूज बॉक्‍समुळे सामान्यांच्या जीवास धोका निर्माण आहे. फलटण परिसरात कित्येक ट्रान्स्फार्मरची अवस्था दयनीय असून, वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. ट्रान्स्फार्मरमधील फ्यूज बॉक्‍सला झाकण नसल्याने धोका आहे. सांगवी परिसरात सोमंथळी, विडणी, राजाळे, कांबळेश्वर, गणेशनगर (महादेवनगर) धुळदेव, अलगुडेवाडीसह संपूर्ण तालुक्‍यातील ट्रान्स्फार्मरच्या सद्यःस्थितीबद्दल बोलायची सोयच नाही. या परिसरात असणाऱ्या फ्यूज बॉक्‍सला दरवाजेच नाहीत. कित्येक कनेक्‍शन्स थेट जोडण्यात आली आहेत. ही अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून "जैसे थे' आहे.
 
विजेची जादा मागणी असतानाही या भागात विद्युतपुरवठा कमी-जास्त झाल्याने वारंवार फ्यूज उडतात. ते बदलण्याऐवजी दुरुस्त करून परत तेच बसवले जातात. फ्यूज दुरुस्त करायच्या लायकीचे न राहिल्याने जवळपास सर्वच कनेक्‍शन थेट जोडण्यात आली आहेत. विद्युत ट्रान्स्फार्मरमधील सततच्या बिघाडामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. वाकलेले खांब, उघडे फ्यूज बॉक्‍स, जमिनीलगत असणारे फ्यूज बॉक्‍स उंच करणे आदी कामांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. 

कित्येक वेळा बिघाड निदर्शनास आणूनही महावितरण कंपनीच्या कामात सुधारणा होत नाही. या कंपनीने चांगल्या प्रकारे कामकाज करावे अन्यथा आंदोलन करू. 

- धनंजय महामूलकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT