शिधापत्रिका नसलेल्यांसाठीही आता गुड न्‍यूज  
सातारा

शिधापत्रिका नसलेल्यांसाठीही आता गुड न्‍यूज

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विना शिधापत्रिकाधारक सर्व कामगार, मजूर, स्थलांतरित, विस्थापित मजूर, तसेच नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेले मात्र संगणकीकृत करण्यात प्रलंबित असलेल्या सर्व विना शिधापत्रिकाधारकांना आता पाच किलो मोफत तांदूळ व एक किलो अख्खा चना प्रतिलाभार्थी कुटुंब संख्येप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, यासाठी बिगर कार्डधारक कामगार, मजूर, स्थलांतरित, तसेच नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेले पण संगणकीकृत करण्याचे प्रलंबित असलेले विनाशिधापत्रिकाधारक पात्र असतील. त्यासाठी अशा लोकांनी आधारकार्ड किंवा कोणत्याही ओळखपत्रासह आपल्यानजीकच्या स्वस्त धान्य दुकानदार, गावकामगार तलाठी यांच्याकडे तत्काळ संपर्क करावा. हे मोफत तांदूळ वाटप जून महिन्याच्या सुरुवातीपासून करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

हे धान्य वितरण विना शिधापत्रिकाधारक सर्व लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता नावनोंदणी करताना सदर लाभार्थ्यांकडून पारदर्शकतेच्या दृष्टीने शिधापत्रिका नसल्याचे हमीपत्र भरून देणे बंधनकारक आहे, तसेच पुराव्यादाखल कोणतेही शासनमान्य ओळखपत्राची नोंद घेतली जाणार आहे,

तरी जिल्ह्यातील गरजू विनाशिधापत्रिकाधारकांनी त्वरित नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदार अथवा गावकामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपले नावनोंदणी करावी. या विना शिधापत्रिकाधारकांच्या याद्या निश्‍चित झाल्यानंतर तहसीलदारांकडून मोठी जागा असणारे व मध्यवर्ती स्वस्त धान्य दुकाने यांची निवड करून धान्य वाटप केले जाणार आहे. 

लाभार्थ्यानी वाटप केंद्रावर गर्दी टाळावी व मास्क परिधान करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

'मला कॅन्सर झाला कारण...' किमोथेरिपीबद्दल बोलताना मेधा मांजेकर म्हणाल्या... 'त्रास व्हायचा तेव्हा...'

SCROLL FOR NEXT