Satara Government Medical College 
सातारा

Satara : शासकीय मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनाला ;शिंदे - फडणवीसांच्या तारखेची प्रतीक्षा

‘मेडिकल’च्या भूमिपूजनाला मुहूर्त कधी?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेच्या स्वच्छतेसह बांधकाम विभागाने तेथे प्रयोगशाळेचे बांधकाम सुरू केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तारीख मिळाल्यावर भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्‍चित होणार आहे. मध्यंतरी मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या आराखड्यात काही बदल सूचविण्यात आले होते. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने मेडिकल कॉलेजच्या मुख्य इमारतीचे कामही सुरू होईल. दरम्यान, काम रखडल्याबद्दल केंद्राकडून त्याची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या तब्बल ४९५ कोटींच्या कामाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मान्यता मिळाली होती. त्यानंतर कॉलेजसाठी घेतलेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेची स्वच्छता करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, कॉलेजमधून जाणाऱ्या रस्त्यावरून वाद उत्पन्न झाल्याने हे काम थांबले होते. या परिसरातील ग्रामस्थांना कॉलेज कॅम्पसच्या बाहेरून रस्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने कॉलेजच्या मूळ इमारतीतही काही बदलही सुचविले होते. त्यानुसार आराखड्यात बदल करून तो मान्यतेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळताच मुख्य इमारतीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे कॉलेजच्या डीन यांनी सांगितले. दरम्यान, बांधकाम विभागाने नियोजित जागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. जागेत शेडची उभारणीही सुरू केली आहे. मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेच्या इमारतीचे बांधकामही सध्या तेथे सुरू केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तारीख मिळताच भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्‍चित होणार आहे.

कामाची चौकशी होणार?

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम काही दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या अधिवेशनात नुकताच आवाज उठवला आहे. मेडिकल कॉलेजचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी हे काम का रखडले? याची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे नेमकी चौकशी कोणाची होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Shinde : शिवराज्याभिषेकासाठी छत्रपती संभाजीनगर ते रायगड पायी प्रवास; छत्रपती शिवरायांचा पुतळा शिरावर घेऊन चालणारा निष्ठावंत शिवप्रेमी

Nashik : २ दिवसांपासून बेपत्ता मुख्याध्यापकाचा मृतदेह आढळला विहिरीत, काठावर दुचाकी; काय घडलं?

इतका खास नव्हता पण आलोक... प्रेक्षकांना आवडला का प्राजक्ता गायकवाडच्या 'पाठराखीण'चा पहिला एपिसोड?

बाबो! वयाच्या 61 व्या वर्षी अमीर खान करतोय तिसरं लग्न! 5 जुलैला गौरी स्प्रॅटसोबत बांधणार लग्नगाठ

Karnataka Chief Minister : कर्नाटकात अखेर सस्पेन्स संपला! हातात संविधान घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT