Satara
Satara 
सातारा

तासवडे औद्योगिक वसाहतीमधील मुरूम उत्खनन कारवाई संशयाच्या भोवऱ्यात?

तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : तासवडे (ता. कऱ्हाड) औद्योगिक वसाहतीमधील राजरोसपणे सुरू असणाऱ्या विनापरवाना मुरूम उत्खननाकडे नेहमीच कानाडोळा करणाऱ्या महसूल विभागाने गेल्या महिन्यात दोन कंपनीच्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या अवैध मुरूम उत्खननावर केलेल्या पंचनामा व नोटीस प्रक्रियेचे पुढे काय झाले? याचे कोडे एक महिन्यानंतरही 
उलगडू शकले नाही. 

एक महिन्यापूर्वी (ता. दहा ऑगस्ट) तासवडे येथील गाव कामगार तलाठी, कोतवालांनी पंचांसह उपसा झाल्याच्या दोन्ही ठिकाणी पाहणी केली. सुमारे तीन ते चार एकरांहून अधिक क्षेत्रात अवैधरीत्या मुरूम उत्खनन करून सपाटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी संबंधितांकडून घाईगडबडीत 1100 ते 1300 ब्रास मुरमाचे उत्खनन झाल्याचा पंचनामा केला. याबाबत मुरूम उत्खनन करणाऱ्या संबंधितांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

पंचनाम्याच्या काही दिवसानंतर कडक कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित यंत्रणेचेच अधिकारी, कर्मचाऱ्यांशी आर्थिक तडजोडीचे लागेबांधे असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणामध्ये कागदोपत्री कारवाईचा दिखावा करण्यात आला असल्याची परिसरात चर्चा आहे. परिणामी महसूल विभागाचा या प्रकरणात नेमका काय गोलमाल आहे हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे, तसेच नेमक्‍या किती मुरमाचे उत्खनन झाले आहे? हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीमधील अवैध मुरूम उत्खननासह चालणाऱ्या अन्य गोरख धंद्यांची संबंधितांनी पोलखोल करावी, अशी मागणीही तासवडेसह परिसरातून होत आहे. 

औद्योगिक वसाहतीमधील विनापरवाना मुरूम उत्खननाच्या पंचनाम्यावर वरिष्ठांकडून दंडाची नोटीस बजावण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे, तसेच दंडाची नोटीस बजावून संबंधितांनी एक महिन्यानंतरही दंड भरला नसल्यामुळे ही कारवाई केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. दंड वसुलीसाठी प्रशासन का गप्प आहे? सर्वसामान्यांच्या बाबतीत प्रशासन अशी भूमिका का घेत नाही. या सर्व प्रकरणाची वरिष्ठांनी कसून चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे, तरच शासनाला चुना लावणाऱ्यांवर आळा बसेल. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT