Satara
Satara 
सातारा

मांढरदेव घाटात दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : तालुक्‍यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून, अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. आज पहाटेच्या सुमारास मांढरदेव घाटात मोठी दरड कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मोठाले दगड रस्त्यावर आल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

तालुक्‍यात गेल्या 24 तासांत सरासरी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आजअखेर एकूण 500.69 मिलिमीटर पाऊस झाला आहे. बलकवडी धरण परिसरात मागील 24 तासांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 1,464 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात 1436 क्‍युसेक पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणीपातळी 810.30 मीटर, तर पाणीसाठा 3.53 टीएमसी आहे. धरण 86.05 टक्के भरले आहे. धोम धरण परिसरात 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण 550 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात 2726 क्‍युसेक पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणीपातळी 741.97 मीटर तर पाणीसाठा 7.45 टीएमसी आहे. धरण 63.78 टक्के भरले आहे. 

दरम्यान, आज पहाटे मांढरदेव घाटात कोचळेवाडी गावाच्या हद्दीत मोठी दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मांढरदेव येथून औद्योगिक वसाहतीत कामाला येणारे चाकरमानी व दूध विक्रेते आदींची वाहने अडकून पडली होती. सकाळी साडेआठ वाजता याबाबतची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जावून जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले मोठे दगड दूर करून वाहतूक सुरळीत केली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT