Krishna Sahakari Sugar Factory esakal
सातारा

'कृष्णा'त माेहित्यांच्या मनाेमिलनावर चर्चेचे गु-हाळ सुरुच

सायंकाळी चारच्या सुमारास बैठक सुरू झाली. त्यामध्ये आमदार चव्हाण, मंत्री कदम, ऍड. उंडाळकर यांच्यासह दोन्ही गटांचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित होते.

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात (krishna sugar factory) माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणाबाबत सलग दुसऱ्या दिवशाही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. पाच जागांवरून एकमत होण्यावाचून एकत्रीकरण राहिले होते, असे समजते. (satara-marathi-news-krishna-sugar-factory-election-2021-karad)

विविध पर्याय खुले ठेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास येथील विश्रामगृहात चर्चेस प्रारंभ झाला. आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी पुढाकार घेऊन बैठकीचे आयोजन केले होते. कारखान्याच्या दोन्ही मोहिते गटांच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी बैठकीत सहभाग होता. सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच एकत्रीकरणाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा बैठकीत सहभागी झालेल्यांकडून व्यक्त होत आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी कॉंग्रेसअंतर्गत हालचाली सुरू आहेत. येथील विश्रामगृहात एकत्रीकरणावरून चर्चा सुरू आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे नेते आमदार चव्हाण व मंत्री कदम यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. युवा नेते ऍड. उंडाळकर यांनाही त्या बैठकीत समाविष्ट करून घेतले आहे. बुधवार दुपारपासून सुरू झालेली बैठक गुरुवारीही सुरूच हाेती. बुधवारी बैठकीत विविध विषयांवर पहाटेपर्यंत चर्चा सुरू झाली होती. त्यात अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहितेही उपस्थित होते. दोन्ही मोहित्यांनी त्यांच्या भूमिका ठामपणे मांडल्यानंतर रात्री उशिरा बऱ्यापैकी त्याच विषयाभोवती फिरणारी चर्चा झाली. त्यानंतर जागा वाटपांचा प्रश्नावरही चर्चा होऊन दोन्ही गटांनी मागे पुढे होण्याचा निर्णय घेऊन तोही विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. जागा वाटपासारखा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्यासाठी आजही बैठकीद्वारे प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास बैठक सुरू झाली. त्यामध्ये आमदार चव्हाण, मंत्री कदम, ऍड. उंडाळकर यांच्यासह दोन्ही गटांचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित होते.

भोसले गटाचे लक्ष

दोन दिवस सुरू असलेल्या बैठकीकडे भोसले गटाचेही लक्ष लागून आहे. त्यांनाही त्या बैठकीतील विविध चर्चांची माहिती घेतली आहे. त्यानुसार त्यांची रणनीती असणार आहे. लवकरच दोन्ही मोहित्यांचा एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे दोन्ही गटांच्या नेत्यांचा विश्वास आहे. त्यादृष्टीन राजकीय हालचालींवर सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT