सातारा

शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा

सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : मेढ्याचे नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. नगराध्यक्ष निवडीवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना दिलेला शब्द शिंदे यांनी पाळला. नगराध्यक्ष शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे नेतृत्व करत नगरपंचायतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये जातीने लक्ष घालत विकासकामांचा धडाका लावला. 

नगराध्यक्ष शिंदे यांची प्रशासनातील अचूक पकड व विकासकामे पूर्णत्वाला जाण्याकरिता सतत पाठपुरावा ठेवत नगरपंचायतमधील राजकारण बाजूला ठेऊन मेढ्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नगरपंचायतीचा कारभार सांभाळल्यापासून अंदाजे दोन कोटी रुपयांची विकासकामे आणण्याचे प्रयत्न शिंदे यांनी केले. 

श्री. शिंदेंनी नुकताच जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या वेळी माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, माजी बांधकाम सभापती विकास देशपांडे, नगरसेवक नारायण देशमुख, संतोष वारागडे, बाळासाहेब आगाशे, गणेश सांवत, राजू नलावडे आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

Aambegaon Heavy Rain: आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस; मंचरमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांना दिलासा तर वाहतूक विस्कळीत

Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT