सातारा

पक्ष मजूबत करा; 'राष्ट्रवादी'च्या बैठकीत नेत्यांकडून सदस्यांची कानउघडणी

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या चार वर्षांतील कामगिरी समाधानकारक नाही, अशा सदस्यांची बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कानउघडणी केली. कोरोनामुळे अनेक सदस्यांना गटनिहाय विकासकामांना अपेक्षाप्रमाणे निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी झाल्या. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाबाबत नेत्यांनी नकारात्मकता दर्शविली. त्यामुळे पदाधिकारी होण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधलेल्या पदाधिकाऱ्यांची निराशा झाली आहे. 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती, कोरोनाच्या काळात ठप्प झालेली विकासकामे मार्गी लावणे, पदाधिकाऱ्यांच्या विविध अडचणी आदींविषयी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शनिवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Video पाहा : साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, काळजी नाही आता; सेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय कार्यकर्त्यांत खळबळ

चिलीम आणि कोंबडीचं रक्त दिलं की धावजी पाटील प्रसन्न होताे...! 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ज्या भागांमध्ये पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे. त्या भागांमध्ये स्थानिक सदस्यांची अनुपस्थिती आदी तक्रारी आमदारांनी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासमोर मांडल्या होत्या. या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या बैठकीत वरिष्ठांकडून सदस्यांचीही कानउघडणी झाली आहे. येत्या वर्षभरात जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार असल्याने गावपातळीवर सदस्यांनी केलेल्या कामाची माहिती बैठकीत घेण्यात आली. त्याचबरोबर ज्या सदस्यांची गेल्या चार वर्षांतील कामगिरी समाधानकारक नाही, अशा सदस्यांची बैठकीत वरिष्ठांकडून झाडाझडती घेण्यात आली. 

""गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नव्हती. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती यांच्या विकासकामांचा आढावा घेऊन इतर पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.'' 

- बाळासाहेब पाटील, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT