सातारा

निवडणूक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा; खंडाळ्यात बावडा ग्रामस्थांचे उपोषण

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुकीच्या मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बावडातील (ता. खंडाळा) ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

बावडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने दिलेल्या कालावधीत तहसीलदार कार्यालयाकडे हरकती दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये जो मतदार ज्या प्रभागात राहायला आहे त्याच ठिकाणी त्याची मतदार नोंदणी व्हावी, असा नियम असताना त्याची पायमल्ली करून यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यासंदर्भात हरकती दाखल करण्यात आल्या, तरीही बहुतांश हरकती डावलण्यात आल्याचे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्या वेळी अतुल पवार, नारायण पवार, श्रीकांत घाटे, राहुल पवार, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र पवार, अभिजित पवार यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT