Satara Latest Marathi News 
सातारा

तासवडे एमआयडीसीत स्थानिकांना कोलदांडा; शिक्षण, अनुभव असतानाही नोकऱ्यांत बाहेरच्यांना संधी

तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : तासवडे (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहतीत अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू आहेत. मात्र, तेथील नोकरभरतीत संबंधित व्यवस्थापन, कामगार ठेकेदारांकडून स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील कामगारांना पसंती दिली जात आहे. परिसरातील अनेक स्थानिक व कुशल युवकांना चांगले शिक्षण व कामाचा अनुभव असतानाही संबंधितांना कोलदांडा दाखवला जात आहे. 

तासवडे औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या उत्पादन व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या 150 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. येथील अनेक कंपन्यांतील उत्पादनांना परदेशातही मागणी असते. कोरोनाच्या काळातही अपवादात्मक वगळता यातील अनेक कंपन्यांमध्ये उत्तम कामकाज सुरू होते. आताही अनेक नामांकित कंपन्यांत चांगले काम सुरू आहे. मात्र, येथील अनेक नामांकित कंपन्यांत नोकरभरती करताना संबंधित व्यवस्थापन व कामगार ठेकेदारांकडून आपल्या मर्जीतील लोकांना नोकरीत घेतले जात आहे.

एमआयडीसीसाठी जमिनी गेलेल्या, त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि वहागाव, घोणशी, तासवडे, वराडे, तळबीड, बेलवडे हवेली आदी परिसरातील स्थानिक युवकांचे चांगले शिक्षण व कामाचा अनुभव असतानाही त्यांना नोकरीमध्ये घेतले जात नाही. अनेक ठेकेदार व्यवस्थापनाला हाताशी धरून कामगारांवर अरेरावी करून त्यांना नोकरीत घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिकांवर मोठा अन्याय होत असल्याची भावना स्थानिकांत निर्माण झाली आहे. 

लोकप्रतिनिधींनीच द्यावा न्याय 

कोरोनामुळे अनेकांना पुणे, मुंबई परिसरातील नोकऱ्या गमवाव्या लागल्या. अनेकांना कंपनी व्यवस्थापनाने कामगार कपातीची कारणे दाखवून कामावरून कमी केले. त्यामुळे अद्यापही अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. तासवडे एमआयडीसीत स्थानिक कुशल कामगारांना नोकऱ्या मिळाल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगला हातभार लागेल, त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने व लोकप्रतिनिधींनी स्थानिक कामगारांना नोकरीत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात मोठा बदल... विरोधकांना कमजोर समजणं NDAला पडलं महागात? दोन-तृतीयांश बहुमताचं स्वप्नाचं काय झालं?

Post Office Scheme: FD पेक्षा भारी ही पोस्टाची स्कीम? फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक अन् 7.5% व्याजदर? पाहा संपूर्ण गणित

Riddhi Thakkar: लेकीचा मृतदेह आणायला जन्मदात्याचा १००० किमी प्रवास, समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : नाशिक पुन्हा हादरलं! ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

SCROLL FOR NEXT