Satara Latest Marathi News 
सातारा

ढेबेवाडीतील Covid Hospital कोमात; उपचारांसाठी रुग्णांसह नातेवाईकांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही येथील 36 ऑक्‍सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल अद्याप बंदच आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवर त्यामुळे उपचारांसाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. 

परिसरात गेल्या वर्षी सहा महिन्यांत कोरोना रुग्णांचा आकडा चारशेच्या घरात पोचला होता. त्यातील सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांची उपचाराविना होणारी परवड लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने नऊ सप्टेंबर रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. जानेवारीत रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर कोविड हॉस्पिटल बंद करून तेथे नियमित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. आता परिसरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला असून, दिवसागणिक रुग्णांचा आकडा वाढतो आहे. कऱ्हाड व साताऱ्यातील सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत.

सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात विचारणा केली जात असली तरी सेवा सुरू झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे हॉस्पिटल कार्यन्वित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या असल्या तरी तेथील आवश्‍यक मनुष्यबळाचे नियोजन मात्र त्यांनी केलेले दिसत नाही. आठ डॉक्‍टर, 12 सफाई कामगार, 13 नर्स, लॅब, एक्‍सरे व ईसीजी टेक्‍निशियन अशी टीम गतवर्षी येथील कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. मुळातच येथील ग्रामीण रुग्णालयात पुरेसे डॉक्‍टर व अन्य सुविधांची वानवा असताना सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तेथील स्थिती दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी झालेली दिसते आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT