Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

बर्ड फ्लूशी मुकबल्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी शेखर सिंह

उमेश बांबरे

सातारा : बर्ड फ्लूबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत वन विभाग, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहभागातून जागृती व तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक, तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात मरण्याचे प्रमाण आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा जिल्हा कंट्रोल रूमशी 1077 या क्रमांकावर माहिती द्यावी. त्यामुळे बर्ड फ्लू पसरू नये, यासाठीच्या उपाययोजना तातडीने करता येतील, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
 
बर्ड फ्लूबाबत जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यांत बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला आहे. त्यानुसार राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन करत आपल्या जिल्ह्यातही काम सुरू केले आहे. त्यासाठी वन विभाग, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून तपासणी व जागृती मोहीम सुरू केली आहे. यामध्ये इतर राज्य व देशातून आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे मायणी अभयारण्यासह इतर तलावांच्या ठिकाणी परदेशी पक्षी येतात. त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये एकत्रितपणे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांतून आपल्याकडे संसर्ग पसरू नये, यासाठी सर्वांनी जागृत राहणे गरजेचे आहे. असे पक्षी ज्या ठिकाणी आहेत. तेथे खबरदारी घेण्याची सूचना वन विभागाला केल्या आहेत. आठवडे बाजार, कत्तलखाने, पोल्ट्री फार्ममध्ये प्रशासनाच्या वतीने सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग आपल्या जिल्ह्यात सध्या तरी नाही, तरीही आपण आतापासूनच तयारी केली तर आगामी काळात आपण या संसर्गाला तोंड देऊ शकणार आहोत.'' जिल्हा पातळीवर मार्केट आहेत. त्या ठिकाणीही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. नागरिकांनी बाहेरचे पक्षी किंवा स्थानिक पक्षी मृत होण्याचे प्रमाण दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, तसेच जिल्हा कंट्रोल रूम 1077 वर संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

नागरिकांनी घाबरू नये : प्रशासन बर्ड फ्लूला तोंड देण्यासाठी खबरदारी घेत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याप्रमाणे कार्यवाही करत आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT