Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

महू धरणाच्या वळणावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; 20 प्रवासी बचावले

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महू धरणाजवळ वळणावर एसटी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. धरणाच्या बाजूला कठड्यावर बस गेल्याने प्रवासी बचावले. 

हा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजता झाला. पाचवड-पाचगणी बस पाचगणीकडे जात होती. महू धरणावर वळणावर पाचगणीहून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकीला वाचवताना गाडी धरणाच्या बाजूला कठड्यावर धडकावली. त्यातील एक कठडा तुटून खाली पडला. 

परंतु, दुसऱ्या कठड्याने गाडी तारून ठेवली, अन्यथा अनर्थ घडला असता. या बसमध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यातील कुणालाही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले आहे. महू व दापवडीचे पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT