Satara Latest Marathi News 
सातारा

प्रवास होणार सुखकर! तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेली एसटीसेवा सुरू; सुपने-किरपेत पहिलाच प्रयोग

अनिल बाबर

तांबवे (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची बंद केलेली एसटी बसची फेरी सुपनेमार्गे किरपेत पुन्हा सुरू करण्यात आली. गावातील विद्यार्थी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या पुढाकारातून ही बससेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

किरपेत एसटी बस येत नसल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य, विद्यार्थी ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात एसटी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी मध्यंतरीच्या काळात किरपे ते लक्ष्मी नारायण मंदिर या मार्गावरील पाणंद रस्त्याचे रुंदीकरणही करण्यात आले. त्यानंतर एसटी बस सुरू झाली. गावात एसटी बस आल्यानंतर गावातील मुख्य चौकात चालक व वाहकाचा सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विद्याधर देवकर, वसंत देसाई, भास्कर देवकर, कृष्णत माने, जालिंदर गुरव, बाजीराव शेवाळे, बजरंग कदम, भानुदास माने, संजय देवकर, शंकर माने, संजय मदने, बाळासाहेब देवकर आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT