सातारा

खटाव जिल्हा परिषद गटात मोठी चुरस; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आव्हान?

राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : खटाव जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींत या वेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला या वेळी मोठे आव्हान मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केल्याने गटात येणाऱ्या दहा ग्रामपंचायतींचे धुमशान रंगत आहे. 

या गटावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांचा प्रभाव आहे. सध्या गटातील कातळगेवाडी सोडून इतर दहा गावांमध्ये निवडणुका होऊन बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. अपवाद रेवलकरवाडी (शिवसेना) व खातगुण (भाजप) आहे. मात्र, अलीकडच्या काळात आमदार महेश शिंदे व युवक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची गावोगावी फळी तयार होत असल्याने राष्ट्रवादीसाठी आजपर्यंत एकहाती वाटणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांत आता चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीला विरोधकांनी तगडे आव्हान निर्माण करण्याची शक्‍यता आहे. 

सध्या प्रत्येक गावात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. गटातील ग्रामपंचायती जास्तीत जास्त आपल्याच ताब्यात कशा येतील, याकडे आमदार महेश शिंदे गट व प्रदीप विधाते गट जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहेत. श्री. विधाते यांनी उपाध्यक्षपदाचा वापर करून या गटातील अनेक गावांत विकासकामे केली आहेत. या विकासकामांची पोचपावती त्यांना मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार महेश शिंदे यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. वेळप्रसंगी त्यांनी स्वतः पैसे खर्च करून जनतेच्या व गावांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक गावांत आपल्या विचारांच्या ग्रामपंचायती निवडून आणण्यात त्यांना यश आले आहे. अलीकडेच स्वखर्चातून उभे केलेल्या कोरोना सेंटरच्या माध्यमातून त्यांचे दातृत्व प्रकर्षाने दिसून आले आहे. 

कातळगेवाडी ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत बिनविरोध करून शासनाच्या अनेक सवलतींचा लाभ घेऊन गावचा विकास केला आहे. यापुढेही अशीच परंपरा अखंडितपणे टिकवणार आहे. 
-संदीप जाधव, सरपंच, कातळगेवाडी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT