सातारा

दरोडा फसला अन् नागरिकांनी धु-धु धुतला!

प्रविण जाधव

सातारा : दरोड्याच्या उद्देशाने रविवार पेठेत फिरणाऱ्या तिघांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून पाच जणांचे टोळके रविवार पेठेत संशयितरित्या फिरत होते. शुक्रवारी (ता. २८) सकाळी नेहमीप्रमाणे एक महिला आणि दोन पुरुष हातात पिशवी घेऊन फिरत होते. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यांना हटकले. तरीही संबंधित व्यक्ती तेथे घुटमळत होत्या. 

त्यानंतर काही नागरिकांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. त्या वेळी त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्या पिशवीतील साहित्याची तपासणी केली. त्या वेळी एक एअरगन आणि गुंगी देण्यासाठी वापरण्यात येणारे क्‍लोरोफॉर्म आढळून आले. त्यामुळे नागरिकांचा संशय खरा ठरला. चिडलेल्या नागरिकांनी तिघांना चांगलाच चोप दिला. बघ्यांची गर्दी झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचे छायाचित्रणही केले. त्यानंतर नागरिकांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून एक महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले. तिघेही एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. या टोळक्‍याचे आणखी दोन साथीदार असून, ते फरारी झाले आहेत. हे सर्वजण पुण्यातील आहेत. ते दरोड्याच्या उद्देशानेच साताऱ्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT