सातारा

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांची 14 दुकानांवर कारवाई

उमेश बांबरे

सातारा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता दुकानात गर्दी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी साताऱ्यातील 14 दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुकानात पाचपेक्षा जास्त व्यक्तींना थांबण्यास मनाई असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.
मोफत धान्य आणायला जाण्यापुर्वी हे वाचा

या आदेशाचे पालन न करणाऱ्या सातारा शहरातील तब्बल 14 दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्याच्या दुकानांसह किराणा व इतर दुकानांचा समावेश आहे. या दुकानमालकांकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सूर्याचीवाडीत फ्लेमिंगोना मिळाला हक्काचा निवारा 

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर पाचशे रुपये दंड आकारावा अशी प्रशासनाची सूचना आहे. सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास एक हजार दंड आकारावा, दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान सहा फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत आली आहे.

सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय

या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झालेस पाचशे रुपयांचा तसेच दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस एक हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत येत आहे. 

पुढच्या रविवारपर्यंत सहकार्य करा, आम्हांला लाेकं महत्वाची पैसे नाही : व्यापारी महासंघ

या  आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झालेस एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस  दाेन हजार रुपये दंड, तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT