सातारा

लॅब टेक्‍निशियनवर घर सोडण्यासाठी दबाव; चौघांवर गुन्हा

प्रविण जाधव

सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात येथील जिल्हा सरकारी हाॅस्पिटलमध्ये काम करणा-या एका महिला लॅब टेक्‍निशियनवर ती भाड्याने राहत असलेले घर सोडण्यासाठी प्रचंड दबाव सोसायटीतील नागरिकांनी आणल्यामुळे सदर महिला लॅब टेक्‍निशियनने थेट जिल्हाधिका-यांकडे संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली. तद्नंतर जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या लॅब टेक्‍निशियनच्या घर मालकाला सांगून त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नंदकुमार बाळकृष्ण साबळे, निलीमा नंदकुमार साबळे, सूर्यकांत शामराव अदाटे व कुमोदिनी सूर्यकांता अदाटे (सर्व रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत करिष्मा रामदास राऊत (रा. कृष्णकुंज अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. त्या जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितांची अँन्टीजेन चाचणी घेण्याचे काम करतात. 

कोरोना योद्‌ध्यांशी, तसेच कोरोना बाधीतांचा कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करून त्यांना त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार दिला आहे. तरीही अशा घटना घडत आहेत. त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. संशयितांनीही असाच प्रकार केल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. संशयितांनी घर मालकाला बोलावून घेतले, तसेच माझ्यामुळे इतरांना कोरोना होऊ शकतो, त्यामुळे मला फ्लॅटमध्ये राहू देऊ नका असे त्यांना सांगून त्रास दिल्याचे राऊत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलिस घोडके तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT