Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

'कृष्णा' कारखान्याची निवडणूक तातडीने घ्या; उच्च न्यायालयाचा राज्य प्राधिकरणास आदेश

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वेळोवेळी पुढे ढकलण्यात आलेली पंचवार्षिक निवडणूक तातडीने घेण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणासही न्यायालयाने आदेश दिला आहे. काले येथील कारखान्याचे सभासद व याचिकाकर्ते डॉ. अजित देसाई यांनी ही माहिती दिली. 

न्यायालयाच्या निकालाबाबात डॉ. देसाई यांनी सविस्तर माहिती दिली. "कृष्णा' कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली आहे. कारखान्याची निवडणूक गेल्या वर्षी होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना महामारीमुळे सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यावर्षीच्या सुरुवातीस निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कार्यकाल संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या जास्त असल्याने "कृष्णा' कारखान्याची निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत संभ्रम होता. त्यामुळे त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात निवडणुकीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची याचिका दाखल केली होती. 

त्यावर न्यायमूर्ती आर. डी. धानुका व व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. डॉ. देसाई यांच्या वतीने ऍड. चेतन पाटील यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, राज्य सरकार आणि "कृष्णा' कारखान्यास प्रतिवादी केले होते. त्या काळात राज्य सरकारने दोन फेब्रुवारीला निवडणुका घेण्यासंदर्भात एक आदेश काढला होता. याचिकाकर्ता व सभासद या नात्याने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही अजून सुरू झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती. ती मागणी ग्राह्य मानून बुधवारी (ता. 10) त्यासंबंधी न्यायालयाने निर्णय दिला. 

उच्च न्यायालयाने "कृष्णा' कारखान्याची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करा, असा स्पष्ट आदेश दिला आहे. या आदेशाच्या प्रती राज्य सरकार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, साखर आयुक्त आणि कारखान्याला दिल्या आहेत. 
-डॉ. अजित देसाई, कारखाना सभासद व याचिकाकर्ते 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT