Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

भविष्यात राष्ट्रवादीप्रमाणे राज्यात रासप 'किंगमेकर' ठरेल; महादेव जानकरांचा विश्वास

प्रवीण जाधव

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाप्रमाणे भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचेही त्यांनी समर्थन केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा येथील नगरपालिका मंगल कार्यालयात आज मेळावा पार पडल. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद देशात वाढण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यातही पक्षाला प्रतिष्ठा मिळत आहे. आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यात फलटण व माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्‍यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये रासपचे आमदार निवडून येतील. त्याचबरोबर राज्यातील अन्य भागातही पक्षाचे आमदार होतील. त्यामुळे ज्या प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आता किंगमेकर आहे, तशी भूमिका भविष्यामध्ये रासप पक्ष निश्‍चित बजावेल. 

केंद्र शासनाने केलेल्या कृषी विधेयकांचे आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्री तोमर हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगली माहित आहे. कॉंग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री असताना गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT