Satara Latest Marathi News 
सातारा

राजकारण बाजूला ठेऊन साताऱ्याला भरघोस निधी देणार; मंत्री चव्हाणांची उदयनराजेंना ग्वाही

उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. समाजकारण, राजकारणापलिकडे जाऊन पुरोगामी विचाराच्या या जिल्ह्यात भौगोलिक विषमतेमुळे अर्थसंकल्पात विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीसाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी करत निवेदन दिले. उदयनराजेंनी निवेदनात म्हटले की, सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या वेगळा असून पश्‍चिमभागातील डोंगरदऱ्यांच्या रांगा तर पूर्वेकडे समतल कोरडा प्रदेश. यामुळे जिल्ह्याचा राज्याच्या अंदाजपत्रकाकरिता विचार करताना विशेष तरतूद केली पाहिजे. 

त्याचप्रमाणे सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच महाराष्ट्रात सर्वांत जास्त वीज निर्मिती येथे होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी श्री. चव्हाण यांना केली. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या काही कामांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश करण्याबाबत सुचविले. अशोक चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयीच्या बाबींवर विचार करुन जिल्ह्यातील जास्तीत-जास्त रस्ते विकास कामांना झुकते माप निश्‍चितपणे दिले जाईल. जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असा विश्‍वास दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मित्रांनीच केला घात! मित्राच्या पत्नीसोबतच २ मित्रांचं नको ते कृत्य, ४ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी; विरारमध्ये खळबळ

Sugarcane Price Protest: तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवू; महाडिक ; ‘राजाराम’वर ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Latest Marathi News Live Update : रशियन कच्च्या तेलाबाबत भारताची मोठी रणनीती, दीर्घकालीन करारांची घाई नको; रुपया मजबूत करण्यासाठीही ठरू शकतो दिलासा

बाजूला हो ना... फराह खानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार; Viral Video पाहून नेटकरी संतापले; म्हणतात-

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

SCROLL FOR NEXT