karad 
सातारा

कऱ्हाड नगरपालिकेस पोर्टेबल ऑक्‍सिजन किट भेट

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः कोरोनाबद्दल नागरिकांमध्ये जागृती आवश्‍यक आहे. त्याबरोबरच सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने आपले कर्तव्यही लक्षात ठेवून सहकार्य करण्याची गरज आहे. त्याच जाणिवेतून पालिकेला ऑक्‍सिजन मशिन देत आहोत. समाजातील क्षमता असलेल्या घटकांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. 

कऱ्हाड नगरपालिकेला श्री. पाटील व सामाजिक कार्यकर्ते पोपटराव साळुंखे यांच्यातर्फे दोन पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन देण्यात आल्या. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे ती यंत्रणा सुपूर्द करताना ते बोलत होते. उपाध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, मुकुंद चरेगावकर उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ""शहरात अनेक नागरिक आर्थिक सक्षम आहेत. त्यांनी कोरोनासारख्या महामारीच्या संकटात मदत करणे आवश्‍यक आहे. गणेश मंडळे, सामाजिक संस्थांनी सामाजिक व कर्तव्याच्या भावनेतून ऑक्‍सिजन मशिन द्याव्यात.'' 

मुख्याधिकारी डाके म्हणाले, ""कोरोना संकट काळात मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार आत्तापर्यंत कऱ्हाड नगरपालिकेकडे दहा ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध आहेत. त्या तत्काळ ज्या कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनजी आवश्‍यकता आहे, त्यांना मशिनद्वारे ऑक्‍सिजन दिला जात आहे.'' 

संपादन ः संजय साळुंखे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT