Satara 
सातारा

विलगीकरण कक्ष कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन, जिल्ह्यातील "या' कोरोना सेंटरवर प्रकार

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : किसन वीर कॉलेज मुलांचे हॉस्टेल येथे सुरू असलेल्या विषाणू संक्रमित रुग्णांसाठीच्या विलगीकरण कक्षातील काही नागरिक कक्षात शिस्तपालन करत नाहीत. कार्यरत कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे, महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे असे बेशिस्त वर्तन करत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. 

विलगीकरण कक्षात नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेचा आढावा वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदय कुसूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी पीपीई किट घालून अचानक भेट देऊन घेतला. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी वरील तक्रारी केल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदारांना या घटनांबाबत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना या कर्मचाऱ्यांना दिल्या.

या अधिकाऱ्यांनी कक्षाच्या आत जाऊन प्रत्यक्ष स्वछतेची माहिती घेऊन निरीक्षण केले. कक्षातील नागरिकांशी संवाद साधून तेथील स्वच्छता तसेच देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा उदाहरणार्थ जेवण, पाणी व निवासव्यवस्था याबद्दल चर्चा केली. त्यावेळी विलगीकरण नागरिकांनी सदर ठिकाणी योग्य प्रमाणात स्वच्छता होत असून, देण्यात येणाऱ्या जेवण व पाणी याची गुणवत्ता योग्य असल्याचे व ते योग्य वेळी मिळत असल्याचे संगितले. विलगीकरण कक्षात ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी बकेट ठेवलेल्या आहेत. येथे स्वच्छतागृहे व्यवस्थित असून येथे पाणी वा स्वच्छता मुबलक असल्याचे संगितले. त्याचप्रमाणे प्रशासनाने गरम पाण्यासाठी गिझर बसविला असल्याने अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध असल्याचे संगितले.

एका खोलीत एकापेक्षा चार व्यक्ती राहत असल्याचे दिसल्यामुळे याबाबत विचारणा केली असता संबंधित नागरिकांनी आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील आहोत. आमच्यासोबत लहान मुले व वृद्ध व्यक्ती असल्याने आम्ही वेगळ्या वेगळ्या खोलीत रहण्यापेक्षा एकत्र राहात आहोत. अधिकाऱ्यांनी नगरिकांना स्वच्छता ठेवण्याबाबत जागरुक करण्याबाबत बोर्ड लावण्याच्या सूचना संबंधित स्वच्छता कंत्राटदार यांना दिल्या. अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी ठेवण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी त्यांनी कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संवाद करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. 


कामकाजाबाबत अधिकाऱ्यांकडून समाधान 

विलगीकरण कक्षास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांनी कक्षाचे कामकाज, व्यवस्था याबाबत समाधान व्यक्त केले आहे व ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी ज्या अतिरिक्त सूचना संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या आहेत, त्यांचे पालन करण्याबाबत संगितले आहे. यावेळी विलगीकरण कक्षाचे नियंत्रण अधिकारी डॉ. योजना तराळ, पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेकर व स्वच्छता कंत्राटदार सुनील साबणे उपस्थित होते. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT