karad 
सातारा

थकीत रक्कम वसूलीसाठी या पालिकेकडून 17 गाळे सील

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः नगरपालिकेची सुमारे 19 लाख 65 हजार 700 रुपये अनामत रक्कम थकीत ठेवणाऱ्या गाळेधारकांवर पालिका करवसुली विभागाने कारवाईचा बडगा उगारला. येथील भाजी मंडईतील नव्या इमारतीतील 17 गाळे सील केले आहेत. त्यांची 18 लाख 90 हजार 700 रुपयांची थकबाकी आहे. कारवाईवेळीच एका थकीत गाळेधारकाने त्याची 75 हजारांची रक्कम आणून भरल्याने त्याच्यावरील कारवाई टळली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. 

शहरातील नव्या भाजी मंडईत 18 गाळेधारकांची अनामत रक्कम 22 लाख एक हजार 700 रुपये आहे. ती रक्कम येणेबाकी आहे. त्याबाबत पालिकेने वारंवार स्मरण पत्रासह विविध मार्गाने वसुलीचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित गाळेधारकांकडून ती रक्कम भरण्यास टाळाटाळच दिसली. त्यामुळे ती रक्कम थकीत गेली. पालिकेने त्यावर कारवाई म्हणून 22 जूनला अंतिम नोटीस देऊन थकीत अनामत रक्कम भरण्याची नोटीस दिली. त्यानुसार त्या वेळी तीन गाळेधारकांनी त्यांची थकीत असलेली दोन लाख 36 हजारांचा रक्कम आणून भरली. त्यामुळे 18 गाळेधारकांची 19 लाख 65 हजार 700 रुपये अनामत रक्कम न भरल्याने ती थकीत झाली. त्या 18 गाळेधारकांवर पालिकेच्या करवसुली विभागाने थेट वसुलीची कारवाई केली. त्यात थेट गाळे सील करण्यासाठी पालिकेचे पथक कर निरीक्षक उमेश महादर यांच्या नेतृत्वाखाली गेले. त्यात अल्ताफ मांगलेकर, गणेश दुबळे, पांडुरंग सपकाळ, विनोद भोसले, रमेश जाधव यांनी कारवाई केली. गाळे सील करताना एका गाळेधारकांनी त्यांची अनामत रक्कम 75 हजार आणून रोख भरल्याने त्यांची कारवाई टळली. मात्र, 17 गाळे पालिकेने आज सील करत रक्कम थकीत ठेवणाऱ्या गाळेधारकांना धक्का दिला आहे. 

(संपादन ः संजय शिंदे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT